२६/ ११ सारखाच काबुलमधील पंचतारांकित हॉटेलवर हल्ला
काबुल । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये २६/ ११ सारखा हल्ला झाला आहे. काबुल मधील शेर ऐ नॉॅ या हॉटेल मध्ये दहशतवादी घुसले आहेत. या हॉटेलला चायनिज हॉटेल असेही म्हटले जाते. कारण या हॉटेलमध्ये बैठकीसाठी अनेक चीनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सतत ये जा सुरू असते. दरम्यान अद्यापपर्यंत हा हल्ला कोणी केला ते स्पष्ट झालेले नाही. सध्या या परिसराला पोलिसांनी वेढले असून गोळीबार आणि स्फोटकांच्या आवाजाने हा भाग हादरला आहे. या हॉटेलमध्ये चीनी नागरिक अडकल्याचे बोलले जात आहे.
An explosion has taken place in Kabul where the #Chinese were living .
— Abdulhaq Omeri (@AbdulhaqOmeri) December 12, 2022
pic.twitter.com/4IU6KAEE23
येथील स्थानिक वृतसंस्था एएफपीने या परिसरात चीनी व्यापाऱ्यांची वर्दळ असल्याचे सांगितले आहे. हॉटेलच्या एका बाजूला आगीचे लोळ दिसत असून आतमध्ये दहशतवादी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दहशतवादी नेमके कुठे लपलेले आहेत हे अद्याप न समजल्याने तालिबानी सुरक्षा रक्षकांना हॉटेलमध्ये प्रवेश करण्यात अनेक अडथळे येत आहेत. तालिबानी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला झाला त्याच्या काहीवेळ आधी चीनचे अॅम्बेसडरनी तालिबानी अधिकाऱ्यांबरोबर सुरक्षे संदर्भात चर्चा केली होती. विशेष म्हणजे दोन आठवड्याआधीच या परिसरात पाकिस्तानी एम्बेसीवरही गोलीबार करण्यात आला होता. यात एक पाकिस्तानी अधिकारी जखमी झाला होता.