TOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश
जगप्रसिध्द शटरस्टॉक कंपनीने खरेदी केला ४३८ कोटी रूपयांचा ‘हा’ प्लॅटफॉर्म
![Shutterstock Company bought the platform for Rs 438 crore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Shutterstock--780x470.jpg)
शटरस्टॉक एक स्टॉक फोटोग्राफी कंपनी आहे. आता शटरस्टॉकने ॲनिमेटेड फोटो GIFs बनवणारा प्लॅटफॉर्म Giphy तब्बल ५३ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४३८ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, शटरस्टॉकचा Giphy खरेदी करण्याचा करार पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकतो. तथापि, शटरस्टॉकने म्हटले आहे की या आर्थिक वर्षात जिफीचा महसूल (Revenue) योगदान खूप कमी असेल. कंपनी २०२४ पर्यंत Giphy चे महसूल योगदान वाढवण्यासाठी अनेक प्लॅन्स करणार आहे.
हेही वाचा – ‘..अशा व्यक्तीला तातडीने तुरूंगात टाका’; रामदेव बाबांची मागणी
शटरस्टॉकचे सीईओ पॉल हेनेसी यांनी म्हटलं की, “ही डील शटरस्टॉकच्या उत्क्रांतीच्या एंड-टू-एंड क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्मच्या रूपात एक मैलाचा दगड आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.