breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उत्पल पर्रिकरांविरोधातील शिवसेना उमेदवाराचा अर्ज मागे

पणजी | टीम ऑनलाइन

गोवा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी न देता डावलल्याने हा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेत अर्ज दाखल केला होता. उत्पल पर्रीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास शिवसेना उमेदवार देणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर उत्पल पर्रीकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरताच शिवसेनेने आपला शब्द पाळत उमेदवाराचा अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती राऊत यांनी ट्विट करुन दिली.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आम्ही आमचा शब्द पाळत आहोत. शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे. पण हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही आहे, असे आमचे मत आहे, असेही राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांचा कोट असलेला एक फोटो या ट्वीटमध्ये ट्विट केला आहे. ज्यात म्हटलेय की, तुम्ही दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट द्याल?. भाजपाने बाबुश म्हणून ओळखले जाणारे अटानासियो मोन्सेरेट यांना पणजीतून उमेदवारी दिल्यानंतर उत्पल पर्रिकरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button