TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

उत्तर प्रदेशात ‘शिंदे प्रयोग’? ; अखिलेश यादवांचा के पी मौर्याना प्रस्ताव, भाजपची टीका

लखनऊ :  समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मौर्य भाजपमधून फुटल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकते, असा दावा केला आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी यादवांवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार फोडून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदी झाले. उत्तर प्रदेशात हाच प्रयोग करण्याची तयारी अखिलेश यादवांनी दर्शवली आहे. भाजपचे १०० आमदार सोबत घेऊन आल्यास मौर्य यांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, असे यादव म्हणाले. उत्तर प्रदेशात पुन्हा निवडून आलेल्या आदित्यनाथ सरकारमध्ये मौर्य यांचे उपमुख्यमंत्रीपद कायम राहिले आहे. असे असताना यादवांनी दिलेल्या या ‘प्रस्तावा’मुळे उत्तर प्रदेश भाजपमध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यादवांच्या प्रस्तावावर मौर्य यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

भाजपचा पलटवार

उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी ट्विटरवरून यादवांना उत्तर दिले आहे. ‘मौर्य हे पक्षाचे निष्ठावान आणि भाजपची विचारधारा मानणारे आहेत. अखिलेश यांनी आपले सहकारी, कुटुंब, पक्ष आणि आमदारांची काळजी करावी. कारण सपाचेच काही आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असे चौधरींनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश राजकीय बलाबल

एकूण जागा      ४०३

सत्ताधारी पक्ष   २७२

भाजप         २५४

अपना दल       १२

निषाद पार्टी      ६

विरोधक         ११९

समजावादी पार्टी १११

राष्ट्रीय लोकदल ८

इतर    १२

सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी)        ६

काँग्रेस  २

जनसत्ता दल   २

बसप   १

रिक्त   १

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button