breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा, कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार नाही

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनाविषयत धोरण समिती मध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज नवीन पतधोरण जाहीर केलं आहे. ८ ते १० ऑगस्टदरम्यान झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चलनविषयक धोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता.

हेही वाचा – ‘येत्या दीड महिन्यात लोकसभा निवडणुका लागणार’; प्रकाश आंबेडकर यांचं सूचक विधान

गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, सध्या रेपो दर ६.५ टक्केच राहील. ६ सदस्यीय चलन विषयक धोरण समितीत रेपो रेट व्यतिरिक्त देशातील वाढती महागाई, अर्थव्यवस्था इत्यादी अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय, त्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती.

RBI ने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला होता. फेब्रुवारीमध्ये चलन विषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारीमधील रेपो दरातील या बदलासह मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो दरात २५० बेसिस पॉईंट्स म्हणजेच २.५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button