शोपियांमध्ये सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
![Security forces kill two terrorists in Shopian](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/terrorist.jpg)
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत माहिती दिली. शोपियां जिल्ह्यातील मुनिहाल भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांच्या मनिहाल भागात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. जम्मू-काश्मीर पोलीस, सेना आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले आहेत. सद्यस्थितीत कारवाई सुरू असून सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सुरक्षा दलांनी 11 मार्चपासून आतापर्यंत 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापूर्वी शोपियांमध्ये 13 मार्चच्या रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते, तर 11 मार्च रोजी अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत जैंशच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.