breaking-newsताज्या घडामोडी

सप्तर्षी फाउंडेशनचे थंडीमधील मदतीचे अभियान: ऊब मायेची”

झुंज दिव्यांग संस्था आश्रम व प्रशिक्षण केंद्र आणि मातृसेवा वृद्धाश्रम यांना सहकार्य

Saptarshi Foundation : सध्या हिवाळा सुरू आहे. रस्त्यावर राहणारे, बेघर, निराश्रित अशा गरजूंना थंडीशी लढावं लागत आहे. दर वर्षी ३१ डिसेंबर रोजी सप्तर्षी फाउंडेशन थंडीपासून ह्या गरजू व्यक्तींचे संरक्षण व्हावे म्हणून आपली मायेची ऊब त्यांना देत असते. त्यासाठी सप्तर्षी फाउंडेशन शीतऋतु संरक्षण अभियान राबवत असते. त्याअंतर्गत विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्या मदतीने थंडीसाठी कपडे व ब्लँकेटस गरजू व्यक्तींना मोफत दिले.

ह्या वर्षी हा उपक्रम झुंज दिव्यांग संस्था आश्रम व प्रशिक्षण केंद्र आणि मातृसेवा वृद्धाश्रम ह्यांच्या सहकार्याने राबवण्यात आला. ह्या संस्थांच्या सहाय्याने व उदार मनाच्या व्यक्तींच्या पुढाकारातून ह्यावेळी गरजूंना कपडे दिले आणि त्यांच्यासोबत केक कापून नवीन वर्षाचा आनंद साजरा केला. त्यांनाही आनंदामध्ये सहभागी करून घेतले. तसेच मातृसेवा वृद्धाश्रम येथे २५ ब्लँकेटसचे वितरण केले गेले. त्याबरोबर ह्या उपक्रमातून सर्व दात्यांच्या सहकार्याने रस्त्यावर राहणा-या गरजूंना ८५ ब्लँकेटस दिले गेले.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड : ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांना “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार जाहीर

ह्या उपक्रमासाठी संजय चौधरी, निशांत गौर, संग्राम गोरे, भूषण ,यशपाल खोब्रागडे, प्रमोद देवकाते, मंगेश सुरवसे, बुद्धभूषण गायकवाड , कपिल सांगोले , अश्विनी सोनगावकर, प्रवीण सोनगावकर,ओंकार दहिवळ, आनंद उदावंत, ऋषिकेश माळवे, अनुराग माळवे, अतुल गायकवाड, ऋषिकेश गडारी, रंजीत बर्गे व संबंधित संस्थांचे सदस्य, सप्तर्षी फाउंडेशन कुटुंबीय व सर्व जागरूक नागरिकांनी सहकार्य केले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button