‘..तर आम्ही कुठल्याही देशावर बॉम्बहल्ला करू’; रशियाची संपुर्ण जगाला धमकी!
आंतरराष्ट्रीय न्यायालयाला रशिया, चीन किंवा अमेरिकेकडून मान्यता नाही
![Russia has threatened that we will bomb any country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/vladimir-putin-1-780x470.jpg)
रशिया आणि युक्रेन युद्ध अज्ञाप थांवण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या वर्षभरापासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. नकतंच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना अटक करण्यासाठी वॉरंट जारी केलं आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने आता आख्ख्या जगाला युद्धाची धमकी दिली आहे.
रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि व्लादिमीर पुतीन यांच्या सुरक्षा कौन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष दिमीत्री मेदवेदेव यांनी थेट धमकी दिली आहे. ते म्हणाले की, पुतीन यांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे अप्रत्यक्षरीत्या युद्धाची घोषणाच असेल. जरा कल्पना करा की एका अण्वस्त्रधारी देशाचा विद्यमान प्रमुख दुसऱ्या एखाद्या देशात गेला, उदाहरणार्थ जर्मनीमध्ये गेला आणि तिथे त्याला अटक झाली, तर त्याचे परिणाम काय होतील? अर्थात, ती रशियन फेडरेशनविरोधात युद्धाची घोषणाच ठरेल. मग अशा परिस्थिती आमची सर्व संरक्षण आणि हल्ला प्रणाली कार्यान्वित होईल. मग रशिया कोणत्याही देशावर बॉम्बहल्ला करू शकतो, असा इशारा मेदवेदेव यांनी दिला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात ICC ला रशिया, चीन किंवा अमेरिकेकडून मान्यताच नाही. त्यामुळे त्यांनी बजावलेल्या वॉरंटला काहीही अर्थ नाही. आम्ही ते वॉरंट मानत नाही, असंही मेदवेदेव म्हणाले.