breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

ब्रिटनमध्ये सत्ताबदल! भारताचे जावई ऋषी सुनक यांचा पराभव, पुढचा पंतप्रधान कोण होणार?

UK Election Results 2024 | ब्रिटनमध्ये सत्तांतर घडून आले असून भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. सकाळी १० वाजेपर्यंत किर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाने ३५९ जागा जिंकल्या आहेत, तर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त ऐंशी जागा मिळाल्या आहेत. एकूण ६५० जागांपैकी ५१५ जागांचा निकाल हाती आला आहे. त्यामुळे २०२४ च्या या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय निश्चित मानला जातोय.

गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेला हुजूर पक्ष आणि प्रमुख विरोधी मजूर पक्ष हे दोन मोठे पक्ष ब्रिटनमध्ये आहेत. तेथील सत्ता ही या दोन पक्षांपैकी एकाकडे असते. त्यातही हुजूर पक्षाला सत्तेत राहण्याची सर्वाधिक संधी ब्रिटनच्या जनतेने दिली आहे. सध्या हुजूर पक्षाचे नेतृत्व सुनक यांच्याकडे, तर मजूर पक्षाची धुरा एप्रिल २०२० पासून स्टार्मर यांच्याकडे आहे. तर, स्टार्मर यांनी या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं असून सुनक यांच्या पक्षाला अवघ्या ८० जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

हेही वाचा   –      पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

कीर स्टार्मर कोण आहेत?

६१ वर्षीय कीर स्टार्मर यांना ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ यांनी कायदा आणि गुन्हेगारी न्याय या क्षेत्रातील कामासाठी विशेष पुरस्कार दिला होता. त्यांनी २०१५ मध्ये लंडनमधून पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. ते पेशाने वकील आहेत. स्टार्मर यांना दोन मुलं आहेत, त्यांची पत्नी व्हिक्टोरिया ही राष्ट्रीय आरोग्य सेवेत कर्मचारी आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाची निराशाजनक कामगिरी होती. त्यानंतर आज जे पक्षाला यश मिळतंय, त्याचं सगळं श्रेय कीर स्टार्मर यांना जातं. विशेष म्हणजे भारतातल्या काश्मीर प्रश्नावर पक्षाचे माजी नेते जेरेमी कॉर्बिन यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे नाराज झालेल्या भारतीयांची मन वळवण्यात स्टार्मर यांना यश आलं.

स्टार्मर यांची आई नर्स होती तर वडील टूलमेकर होते. ब्रिटमधल्या ऑक्स्टेडमध्ये ते लहानाचे मोठे झाले. २०१५ मध्ये आई जोसेफिन यांचं निधन झालं. तेव्हा कीर हे खासदार होते. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये स्टार्मर यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. आज कीर हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button