Propose Day | प्रेम व्यक्त करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; तुम्हाला कधीच मिळणार नाही नाकार!
![Remember these things when expressing love; You will never get rejected](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Propose-Day-780x470.jpg)
Propose Day | व्हॅलेंटाईन विकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. आपल्या मनातील प्रेम त्याच्या अथवा तिच्यापर्यंत पोहचविण्याचा हा महत्वाचा दिवस. मात्र, अनेकांना त्यांच्या मनातील गोष्टी सांगता येत नाही. परंतु आता यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर मनमोकळेपणाने बिन्दास्त बोलू शकाल.
प्रपोस करतांना काय काळजी घ्यावी?
प्रपोज करताना आपण एका भारतीय मुलीला प्रपोज करीत आहोत याचे भान असणे गरजेचे आहे मग ती कितीही मॉडर्न असली तरी काही हरकत नाही.
याशिवाय सर्वप्रथम हे देखील आपणास माहित असावे की, आपण ज्या मुलीला प्रपोज करणार आहोत तिचीपण तुमच्यात आवड आहे की नाही. नाहीतर उगाच आपण नाराज होण्याची शक्यता असते.
तसेच कोणत्याही व्यक्तीला प्रपोज करण्याअगोदर आपल्या ड्रीम गर्लची आवड-नावड याबाबतही तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते.
ती इतर कोणात तरी बिजी तर नाही ना किंवा ती कोणाला तरी लाइक तर करीत नाही ना, याबाबतही सुनिश्चित करुन घ्या.
हेही वाचा – काँग्रेसला मोठा धक्का! मुंबईतील मोठे नेते बाबा सिद्दीकींचा राजीनामा
कुठलेही नाते हे वेळेबरोबर घट्ट होत जाते. अशावेळी आपल्या ड्रीम गर्लला आपण किती प्रेम करतोय हे सांगाण्याची गरज नसते. आपले बोलणे आणि आपल्या वागण्याद्वारे समजू द्या की आपण किती प्रेम करता ते. मात्र आपले नाते विना आपल्या प्रपोजचे पुढे वाढू शकत नाही, यासाठी योग्यवेळी हिंट देत राहा.
आपण आपल्या पार्टनरला ही जाणिव करुन द्या की, तुम्ही त्यांच्या फॅमिलीविषयी जाणून घेण्यात इंटरेस्टेड आहात आणि सोबतच आपण व आपल्या परिवाराबाबतही माहिती शेअर करत राहा.
जेव्हाही आपण आपल्या पार्टनरला प्रपोज करणार त्याप्रसंगी तिसरा कोणी नसावा. अशावेळी आपल्या पार्टनरसमोर आपली इमेज खराब होऊ शकते. शिवाय याबाबत आपण कॉन्फिडेंडदेखील राहा.
हा दिवस आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी आपला ड्रेसकोडही व्यवस्थित असावा.
या दिवशी काही वेगळे आणि क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. असे वाटायला हवे की, या अगोदर कोणीच कोणाला अशा पद्धतीने प्रपोज केला नसेल.
ही क्रिएटिव्हिटी आणि आपला व्यवहार आपल्या पार्टनरला आपल्या जवळ आणण्यास खूप मदत करेल.