breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर आज शेअर बाजारात विक्रमी उसळी

Share Market Today | लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला असून या निकालाचा परिणाम सध्या शेअर बाजारावर दिसत आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोल्सच्या माध्यमातून देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच शक्यतेचा थेट परिणाम आज आठवड्याचा पहिल्याच दिवस शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग मार्केटमध्येच दिसून आला.

प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्सने ३०५१ अंकांची तर निफ्टीनेही ८७० अंकांनी उसळी घेतली. प्री-ओपनिंग सेशनमध्ये दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली. त्यामुळे शेअर बाजार चालू झाल्यामुळेदेखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीत तेजी पाहायला मिळाली. पहिल्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स थेट २२०० पर्यंत उसळला. तर बाजार चालू होताच निफ्टीदेखील थेट २३,३३७.९ अंकापर्यंत वधारला.

हेही वाचा    –      अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी ७० तरुण महाराष्ट्रात, मुंबई पोलीसांचा मोठा खुलासा 

एवढेच नव्हे तर सेन्सेक्सने ७६,७३८.८९ अंकांचा ऐतिहासिक स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले. तर सध्या हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहेत. त्यामुळे सत्राच्या पहिल्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे.

दरम्यान, उद्या म्हणजेच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता मार्केट तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button