breaking-newsताज्या घडामोडी

CIBIL स्कोरच्या संदर्भात RBI ने नियमात केला मोठा बदल, कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘हा’ नियम

RBI | कर्ज मिळवण्यासाठी सिबील स्कोर असणं खूप महत्वाचं असतं. सिबील स्कोर चांगला असल्यास कर्ज मिळवण्यात अडचण येत नाही. नवीन नियमानुसार, ग्राहकांचा सिबील स्कोर प्रत्येक १५ दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळं ग्राहकांना त्यांचा CIBIL स्कोर चांगला ठेवावा लागणार आहे. हा नवीन नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार CIBIL स्कोर हा दर महिन्याच्या १५ तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या त्यांच्या इच्छेनुसार देखील तारखा निश्चित करु शकतात. ज्या अंतर्गत डेटा अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्थांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती दर महिन्याला सीआयसी यांच्याकडे सबमिट करणं आवश्यक आहे.

हेही वाचा       –      ‘अनिल देशमुख आणि मी जेलमध्ये खिमा पाव बनवायचो’; संजय राऊतांचं विधान 

दरम्यान, या निर्णयाचा बँक आणि ग्राहक या दोघांनांदी फायदा होणार आहे. बँक आणि एनबीएफसी या दोन्हींसाठी देखील क्रेडिट माहिती खूप महत्वाची आहे. याद्वारे ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला देऊ नये याबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकतात. यामुळं कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर ठरवण्यात देखील मदत होणार आहे. चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button