breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

राजेश अग्रवाल यांची लंडनच्या उपमहापौरपदी दुसऱ्यांदा निवड

लंडन – भारतातील इंदूरमध्ये जन्मलेले आणि मोठ्या कष्टाने कोट्यधीश बनलेले राजेश अग्रवाल हे आता दुसऱ्यांदा लंडनचे उपमहापौर बनले आहेत. अग्रवाल हे जेव्हा भारतातून लंडनला गेले त्यावेळी त्यांना विमानाच्या तिकिटासाठी स्वतःची बाईक विकावी लागली होती. एवढ्या खडतर भूतकाळातून त्यांची वाटचाल झाली आहे.

याआधी २०१६मध्ये राजेश अग्रवाल यांना लंडनच्या उपमहापौरपदी निवडण्यात आले होते. त्यानंतर आता महापौर सादिक खान यांनी सलग दुसऱ्यांदा त्यांच्या नावाला पुन्हा पसंती दर्शवली आहे. खान यांनी गेल्या महिन्यातच महापौर पदाची निवडणूक जिंकली आहे. आता अग्रवाल यांचा पुढील कार्यकाल २०२४ पर्यंत राहणार आहे. इंदुरमधील सेंट पॉल स्कुलमधून शिक्षण घेतलेल्या राजेश अग्रवाल यांची आई एक शिक्षिका होत्या. तर वडील सरकारी नोकरदार होते. १९१९मध्ये एमबीए झालेल्या अग्रवाल यांनी नंतर वेब डिझायनिंगमध्ये सेल्सची नोकरी केली होती. या कंपनीत काम करताना त्यांना सहा महिने मुंबईत आणि सहा महिने लंडनमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. पुढे लंडनमध्ये राहून त्यांनी स्वतःच्या मोठ्या दोन कंपन्यांची स्थापना केली. इतकेच नाही तर त्यांच्या एका कंपनीने लंडनमधील पहिल्या १०० कंपन्यांमध्ये स्थान प्रस्थापित केले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button