राजस्थानच्या काळा डोंगर जागेत दत्त महाराजांचे मंदिर
दत्तगुरूंचा अगाध महिमा ! या मंदिरात दररोज कोल्हे लावतात हजेरी?
![Rajasthan, Kala, Dongar, Datta Maharaj Temple, Dattaguru, Mahima, Temple, Fox, Attendance,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/datta-780x470.jpg)
राष्ट्रीय : भारतात दत्त महाराजांची अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्यापैकी, एक मंदिर राजस्थानमध्ये आहे. जिथे अनेक वर्षांपूर्वी घडलेला चमत्कार आजही पहायला मिळतो. राजस्थानच्या काळा डोंगर या जागेत दत्त महाराजांचे मंदिर आहे. जिथे दररोज सकाळी आणि सायंकाळी कोल्हे हजेरी लावतात. यामागील कथा आणि महत्त्व जाणून घेऊयात.
मंदिरातील नित्यक्रम (Datta Jayanti 2024)
राजस्थानमधील कच्छमध्ये काळा डोंगर परिसरात श्री दत्त गुरुंचे मंदिर आहे. या मंदिराबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. या मंदिरात दररोज नित्यपूजा, आरती, अभिषेक केला जातो. इथे सकाळी आणि सायंकाळी दत्त गुरूंची आरतीही केली जाते.
असं म्हटलं जातं की, सतयुगात इथे श्री दत्त महाराजांनी ध्यानधारणा केली होती. तसेच, इथून भ्रमण करताना त्यांनी या जागेला वरदान दिले. त्यामुळे, कोरड्याठक्क पडलेल्या राजस्थानातील या मंदिर प्रासादाजवळील काही भाग हिरवागार आहे. (Datta Jayanti)
मंदिरात घडणारा चमत्कार (Datta Mandir In Rajsthan)
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, खूप वर्षांपूर्वी दत्त गुरूंनी या मंदिराच्या आवारात तपश्चर्या केली होती. दत्त महाराज तपश्चर्येला बसले होते. त्या मंदिर आवारात घनदाट जंगल होतं. त्यामुळं जंगली पशू नेहमीच इथे भटकायचे. जेव्हा दत्त महाराज तप करत होते तेव्हा तिथे एक भुकेला कोल्हा आला.
त्याने दत्तगुरूंना तपश्चर्येतून जागे केले आणि त्यांच्याकडे अन्न मागू लागला. तेव्हा दत्त महाराजांकडे काहीच नव्हतं. पण कोल्ह्याची अवस्था पाहून त्यांनी स्वत:च्या हाताचे तुकडे करून त्याच्या पुढे ठेवले. म्हणजे कोल्हा हा मासांवर जगतो पण तरीही त्याने दत्त महाराजांच्या शरीराला स्पर्शही केला नाही.
त्याला प्रसाद हवा होता दत्त गुरूंचा. कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन महाराजांकडे पाहत होता. तेव्हा दत्त महाराजांनी जवळ असलेल्या एका पितळेच्या पात्रात गुळ आणि भात उत्पन्न केला. त्यांनी तो गुळ भात कोल्ह्याला खायला घातला. कोल्हा ते खाऊन तृत्प झाला आणि तेव्हापासून आजही दिवसातून दोनवेळा कोल्हे मंदिर आवारातील पारावर येतात आणि भक्तांनी पाहिलेला गुळ आणि भात खाऊन जातात.
जंगलातील मिळेल ते मांस खाऊन जगणाऱ्या कोल्ह्याला गुळ भात खाताना पाहणं यात मोठं आश्चर्यच आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी अनेक भाविक मंदिरात येतात. दर्शन घेतात. तसेच, कोल्ह्यांसाठी आठवणीने गुळ-भात आणतात.
इतरवेळी होत नाही कोल्ह्यांचे दर्शन (Datta Maharaj Unique Temple In Rajsthan)
या मंदिरात दररोज सकाळी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हा प्रसाद कोल्ह्यांसाठी ठेवला जातो. प्रसाद ठेवल्यानंतर मंदिरातील एक व्यक्ती प्रसादाची पाटी काठीने वाजवतो. आणि कोल्ह्यांना बोलावतो. तो व्यक्ती तिथून निघून गेला की कोल्हे येतात आणि प्रसाद संपवतात. विशेष गोष्ट अशी की, इतरवेळी हे कोल्हे मंदिर आवारात दिसत नाहीत. तसेच, या संपूर्ण भागातही कोल्हे दिसून येत नाहीत. केवळ सकाळी १२ आणि सायंकाळी ६ वाजताच त्यांचे दर्शन होते.
कोल्ह्यांना प्रसाद देताना म्हणतात असं (Kala Dongur Datta Maharaj Temple)
कोल्ह्यांना प्रसाद देताना एक विशिष्ट शब्द उच्चारून बोलावलं जातं. त्यासाठी लौंग असं म्हटलं जातं. हे यासाठी आहे की, गुरू दत्तांनी कोल्ह्याला शरीराचे भाग कापून खायला दिले तेव्हा ‘ले अंग’ असे म्हटले. त्यानंतर ले अंग, ले अंग याचे लौंग असा उच्चार पुढे रूढ झाला.