breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जनतेशी संवाद

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. उद्या २१ जून रोजी जगभरात योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

उद्या 21 जून रोजी आपण 7 वा योग दिवस साजरा करणार आहोत. ‘योग फॉर वेलनेस’ ही या वर्षीची थीम आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर या थीमचा भर आहे. उद्या सकाळी साडे सहा वाजता योग दिवसाच्या कार्यक्रमाला मी संबोधित करणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं योग दिनानिमित्ताचं भाषण दूरदर्शन सहीत अन्य चॅनेल्सवर लाइव्ह दाखवलं जाणार आहे. यावेळी आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजूही संवाद साधणार आहेत. देशभरात योग दिनाचे विविध ठिकाणी कार्यक्रम होणार असून त्यात अनेक मान्यवर भाग घेणार आहेत.

दरम्यान, कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन एका कार्यक्रम स्थळी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते 7.45 पर्यंत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लाल किल्ला परिसरात योग करणार आहेत. कोरोनामुळे यंदा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांनी संवाद साधल्यानंतर योगा केला जाणार आहे. लोकांनी घरीच राहून व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. योगा झाल्यानंतर आध्यात्मिक आणि योग गुरुही जनतेशी संवाद साधणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button