पंतप्रधान मोदी आज दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार
![#CovidVaccine: Why is it so late to get vaccinated? Modi said because](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/modi_1_20200427_571_855-1.jpg)
नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 20 मे रोजी कोरोनामुळे प्रभावित दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. यात महाराष्ट्रासह दहा राज्यांतील 54 जिल्हाधिकार्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय, संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार यावर यावेळी चर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील या संवादात सहभागी होणार आहेत. दरम्यान, याआधी पंतप्रधानांनी १८ मे रोजी 9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विविध राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्गाने प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओदिशा आणि पुद्दुचेरीमधील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत.