Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींचा सोशल मीडियावरही दबदबा; इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्स

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्सचा आकडा पार करत त्यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठणारे ते पहिले जागतिक राजकीय नेते ठरले आहेत. यावरून पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट होते.

फॉलोअर्सच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे. मोदी सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांच्या पोस्टना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंना लाखो लाईक्स आणि शेअर्स मिळत असतात.

हेही वाचा        :              पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत दणदणीत विजय 

२०१४ मध्ये पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मोदींची सोशल मीडियावरील उपस्थिती सातत्याने वाढली आहे. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर ते कोणालाही फॉलो करत नाहीत. त्यांच्या अधिकृत खात्यावर आतापर्यंत १२०५ पोस्ट करण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियावर मोदींचे फॉलोअर्स (अंदाजे):

एक्स (Twitter): १०६.२ दशलक्ष
इन्स्टाग्राम: १०० दशलक्ष
फेसबुक: ५४ दशलक्ष
लिंक्डइन: ५३.११ लाख

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button