breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

राज्‍यात मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात: छत्रपती संभाजीनगर,कोल्हापूरसह अनेक ठिकाणी हजेरी

Pre-monsoon rains : राज्‍यभरात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरसह अन्‍य जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटामध्ये वादळी पावसाने तडाखा दिल्‍याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावली. पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिला. करमाड, शेकटा आणि करंजगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. बिडकिन शिवारात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांच्या पपईच्या बागांना बसला असून हे पीक आडवे झाले आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. उन्हाळी पिकांना देखील याचा मोठा फटाका बसला आहे.

हेही वाचा – AAP ला अमेरिका, कॅनडा, अरब देशातून मिळाली कोट्यवधीची माया, ED चा गृहमंत्रालयाला धक्कादायक अहवाल

जोतिबा रोडवर एक भलं मोठं झाड चार चाकीवर येऊन कोसळले. या वाहनामध्ये पाच ते सहा भाविक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान याच रोडवरती जवळपास सात ते आठ झाडे वादळामध्ये पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कसबा बावडा ते वडणगे रस्त्यावर सुद्धा झाडांसह वीजेचे खांब वादळामुळे मोडून पडले आहेत. वडणगे स्मशानभूमीचे छतही उडून गेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच उकाडा मात्र कायम आहे. दरम्यान, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button