POK मधील त्या घरांजवळ SSG कमांडोंची तैनाती का वाढवली ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/indian-army.jpg)
काश्मीर | महाईन्यूज
दहशतवाद्यांसाठी लाँचपॅड म्हणून पाक व्याप्त काश्मीरमधील काही नागरिकांच्या घरांचा वापर करण्यात येत असल्याचा भारतीय लष्कराला संशय आलेला आहे. पीओकेमधील नागरिकांच्या घराजवळ अतिरिक्त एसएसजी कमांडो तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराचा संशय बळावला गेलेला आहे. पीओकेमधील काही घरांजवळ सुरु असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर भारतीय लष्कराचे अत्यंत बारीक लक्ष आहे.
काश्मीरमध्ये अनेक भाग हे सध्या बर्फाने झाकले गेलेले आहेत. नौशेरा, सुंदरबनी, कृष्णा घाटी, भीमबेर गाली आणि पूँछ या भागामध्ये मोठया प्रमाणावर धुमश्चक्री सुरु झालेली आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या तोफगोळयांच्या माऱ्यामुळे या भागात तणाव आहे.“पीओकेमधील अनेक नागरी घरांचा लाँचपॅड म्हणून वापर करण्यात येत आहे.व आम्हाला त्याची पूर्ण कल्पना असून, आम्हाला ती घरे सुद्धा माहित आहेत. घुसखोरांना मदत करण्यासाठी म्हणून या घरांचा वापर करण्यात येत आहे” लेफ्टनंट जनरल हर्षा गुप्ता यांनी ही माहिती दिलेली आहे.