breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Poco X3 स्मार्टफोनचा जलवा, ३ दिवसात १ लाखांहून जास्त फोनची विक्री

नवी दिल्ली – टेक ब्रँड पोकोकडून गेल्या आठवड्यात नवीन Poco X3 NFC स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. ८ सप्टेंबर रोजी याची विक्री सुरू झाली होती. कंपनीने सोशल मीडियावर शेयर केले की, नवीन स्मार्टफोनने रेकॉर्ड बनवला आहे. केवळ तीन दिवसात एक लाखांहून अधिक फोनची विक्री झाली आहे.

कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. यात सांगितले की, पहिल्याच सेलमध्ये Poco X3 NFC स्मार्टफोनने रेकॉर्ड बनवला आहे. पोको चाहत्यांना धन्यवाद देताना कंपनीने विक्रीचे आकडे सुद्धा शेयर केले आहेत. फोटोत दिसतेय की, ३ सेकंदात १०००, पहिल्या ३० मिनिटात १० हजार, पहिल्या एका तासांत १५ हजार, पहिल्या दिवशी ६१ हजार आणि तीन दिवसांत १ लाखांहून अधिक फोनची विक्री झाली आहे. या फोनची किंमत कमी आहे.

फ्लॅगशीप सारखे फीचर्स
फोनमध्ये ६.६७ इंचाचा FHD+ डॉट डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. याचा टच सँपलिंग रेड 240Hz आहे. जबरदस्त डिस्प्ले फ्लॅगशीप लेवलच्या फोनच्या हार्डवेयरला टक्कर देतो. तसेच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर सोबत लाँच होणारा पहिला फोन आहे. यात ६ जीबी रॅमपर्यंत स्टोरेज मिळते. नवीन फोनला ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज पर्यायात उतरवले आहे.

२० हजारांपेक्षा कमी किंमत
या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. यात पॉवरफुल क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ८०० रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ७५० रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button