Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना ; तीन प्रमुख सत्रांना संबोधित करणार

Pm Modi South Africa Visit :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  २० व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग याठिकाणी २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ही शिखर परिषद होणार आहे.  दक्षिण आफ्रिकेने आयोजित केली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, आफ्रिकन खंडात होणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे. ग्लोबल साउथमध्ये होणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे.

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून दौऱ्यावर निघताना पंतप्रधान मोदी यांनी, ही शिखर परिषद अनेक प्रकारे महत्त्वाची आहे. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात (२०२३) आफ्रिकन युनियनला G20 चे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आले होते आणि आता आफ्रिकेत ही शिखर परिषद आयोजित केल्याने त्या ऐतिहासिक पायरीला आणखी बळकटी मिळते याची आठवण त्यांनी करून दिली.

हेही वाचा –  आमदार-खासदारांना सन्मानाची अन् सौजन्याची वागणूक देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

या वर्षीच्या G20 शिखर परिषदेची थीम ‘एकता, समानता आणि शाश्वतता’ आहे. ही थीम भारत आणि ब्राझीलमध्ये झालेल्या मागील दोन शिखर परिषदेची सातत्यता पुढे नेत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते ‘वसुधैव कुटुंबकम’ – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या तत्वज्ञानावर आधारित शिखर परिषदेत भारताचे दृष्टिकोन सादर करतील.”

शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदी सहाव्या IBSA (भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका) शिखर परिषदेला देखील उपस्थित राहतील. येथे धोरणात्मक सहकार्य, जागतिक आव्हाने, आर्थिक भागीदारी आणि तीन देशांमधील विकास अजेंडा यावर चर्चा केली जाईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button