breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

‘Oppo Reno 3 Pro’ आज होणार भारतात लाँच

स्मार्टफोन कंपनी ओप्पोने रेनॉ सीरीज अंतर्गत Oppo Reno 3 Pro चा फोन आज म्हणजे 2 मार्च आणि2020 ला लाँच होणार आहे. आता ओप्पोने भारतात या स्मार्टफोनची प्री ऑर्डर घेणेही सुरू केले आहे. तसेच या नव्या फोनवर अनेक ऑफर्स आणि सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनची प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँकेंच्या कार्ड्सवर १० टक्के कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.

Oppo Reno 3 Pro प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना एचडीएफसी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, आयसीआयसीआय बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर, आरबीएस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर तसेच यस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ईएमआय आणि कंज्युमर लोन ट्रान्झॅक्सन केल्या १० टक्के कॅशबॅक दिला जात आहे. ओप्पोने हा फोन गेल्यावर्षी चीनमध्ये लाँच केला होता. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. चीनमध्ये ५जी कनेक्टिविटी सपोर्ट आहे. भारतात सध्या ४ जी नेटवर्क असल्याने या पर्यायात हा फोन उतरवला जाऊ शकतो.

Oppo Reno 3 Pro ची खास वैशिष्ट्ये
रियलमी 6 आणि रियलमी 6 प्रो मध्ये हाईयर मॉडेल म्हणजे Realme 6 Pro स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल. या चिपसेट वर अजूनतरी कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाला नाही. अर्थात् Realme 6 Pro जगातील पहिला फोन असेल जो स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट वर लॉन्च होईल. तर Realme 6 मध्ये मीडियाटेक हेलियो जी90 चिपसेट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हेलियो जी90 वर पण आतापर्यंत कोणताही स्मार्टफोन लॉन्च झालेला नाही. म्हणजे Realme 6 जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक हेलियो जी90 सह बाजारात एंट्री घेईल.


या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ४४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पिल -शेप होल पंच कटआऊट दिला आहे. चीनमधील याच मॉडेलवर ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला होता. रियरमध्ये फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या सेटअपमध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो आणि २ मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर दिला आहे. हा ४ के व्हिडिओ रिकॉर्डिंग ३० एफपीएस वर सपोर्ट दिला आहे. ओप्पोचा हा फोन दोन पर्यायात म्हणजेच ८ जीबी प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी प्लस २५६ जीबीमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ४,०२५ एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button