breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एकीकडे वडिलांनी नोंदवली अपहरणाची तक्रार; दुसरीकडे मुलीने स्टेटस टाकलं ‘Got Married’; नक्की काय गोंधळ झाला?

बिहार |

बिहारमध्ये एका मुलीच्या वडिलांनी तिच्या अपहरणाची तक्रार केली. मात्र त्यानंतर काही वेळातच तिने आपण लग्न केल्याची पोस्ट आपल्या सोशल मीडियावरून केली आहे. त्याचबरोबर वडिलांना उद्देशून एक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आम्हाला त्रास देऊ नका, असं ती आपल्या वडिलांना या व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहे. बिहारमधील हाजीपूरमध्ये एका मुलीनं तिच्या अपहरणाचा FIR खोटा असल्याचं सांगत पोलिसांकडे मदतीची विनंती केली आहे. या मुलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या तपासात असे आढळून आले की, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी गोरौल पोलीस स्टेशनच्या मलिकपुरा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी गौरोल पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता.

FIR नोंदवल्यानंतर मुलीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर GOT MARRIED असं स्टेटस अपडेट केलं. त्यानंतर व्हिडीओ आणि फोटो टाकून आपण सज्ञान असल्याचं सांगून वडिलांवर छळ केल्याचा आरोप केला. अपहरण झाल्याची FIR दाखल झाल्यानंतर मुलीने पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये मुलगी एका मुलासोबत दिसत आहे. मुलगी सांगते की तिने स्वतःच्या इच्छेने मुलाशी लग्न केले आहे आणि ती आनंदी आहे. ही मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असून मला त्रास देऊ नये, अशी विनंती कुटुंबीयांना करताना दिसत आहे. FIR आणि त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून हे प्रकरण प्रेमप्रकरण आणि त्याच्याशी संबंधित वादाचे असल्याचे दिसते. सध्या पोलिसांजवळ अपहरणाचा गुन्हा आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ आहे. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button