ओमायक्रॉनची धास्ती! पंढरपूर आणि शिर्डीत निर्बंध, रात्री ९ नंतर दर्शन बंद
पंढरपूर | प्रतिनिधी
ओमिक्रोनच्या वाढत्या संकटामुळे आणि सरकारने राज्यात लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे आता पंढरपुरचे विठ्ठल मंदिर आणि शिर्डीचे साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी हि नियमावली लक्षात ठेऊनच दर्शनासाठी जाने सोयीस्कर ठरू शकेल.
सध्या नाताळच्या सुट्टीमुळे पंढरपूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. दर्शनासाठीच्या मोठ्याच मोठ्या रांग लागलेल्या आहेत. या गर्दीमुळे दोन्ही ठिकाणच्या देवस्थान संस्थांची चिंता वाढली आहे. आणि म्हणूनच पंढरपूर आणि शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे त्यानुसार विठ्ठल मंदीर रात्री ९ वाजल्यानंतर बंद ठेवले जाईल, अशी माहिती मंदिर समितीने दिली. मात्र परिसरातील गर्दीला कसे आवरायचे कारण रात्रीची जमावबंदी असल्याने मंदिर परिसरात गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तशा सूचनाही दिल्या आहेत. तर शिर्डी मध्येही रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत साई मंदिर बंद ठेवले जाणार आहे.