ओला, उबरची भाडेवाढ, प्रवास ‘इतके’ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Ola Uber Fare Hike | अॅप आधारित टॅक्सी सेवा वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. परिवहन विभागाने ओला आणि उबरसारख्या टॅक्सी सेवांचे भाडे 18 सप्टेंबर पासून निश्चित केले आहे. या नवीन नियमानुसार आता प्रति किलोमीटर 22.72 रुपये असा निश्चित दर असणार आहे. प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि चालकांकडून वारंवार होणाऱ्या आंदोलनावर उपाय म्हणून सध्या हे धोरण लागू करण्यात आले आहे.
या नव्या नियमात मागणीनुसार भाड्यात बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. जास्त मागणी असलेल्या काळात म्हणजेच गर्दीच्या वेळी हे भाडे 1.5 पट वाढवण्याची परवानगी असेल. त्यामुळे अशा वेळी प्रति किलोमीटर सुमारे 34 रुपये भाडे आकारले जाईल. याउलट मागणी कमी असताना मूळ भाड्यापेक्षा 25 टक्के कमी दर आकारला जाईल म्हणजेच सुमारे 17 रुपये प्रति किलोमीटर भाडे आकारले जाईल.
हेही वाचा : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याकडून हैदराबाद गॅझेटला विरोध
निश्चित दर लागू झाल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी कंपन्यांकडून मागणीच्या वेळेत प्रति किलोमीटर 46 ते 48 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त भाडे आकारले जात होते तर मागणी नसताना 10 रुपयांपेक्षा कमी भाडे आकारले जायचे. नवीन नियमामुळे भाड्याचे दर अधिक पारदर्शक होतील आणि दोन्ही टोकांच्या दराला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.




