breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

उत्तर कोरियात चक्क हसण्यावर ११ दिवसांची बंदी; हुकूमशाह किम जोंग उनने दिला आदेश

नवी दिल्ली |

उत्तर कोरियात हुकूमशाह किम जोंग उनची सत्ता असल्याने लोकांना कोणते आदेश पाळावे लागतील सांगता येत नाही. रोज नवा आदेश देत लोकांवर करडी नजर ठेवली जात आहे. आता माजी नेते किम जोंग इल यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरियात शोक पाळण्यात येत आहे. त्यामुळे जनतेवर ११ दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. या काळात देशातील जनता हसू शकत नाही, खूश होऊ शकत नाही आणि दारूही पिऊ शकत नाही. किम जोंग इल यांच्या निधनाच्या स्मरणार्थ लोकांनी कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करू नये, असे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. किम जोंग इल यांनी १९९४ ते २०११ पर्यंत उत्तर कोरियावर राज्य केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. किम जोंग इल यांच्या निधनानंतर त्यांचा धाकटा मुलगा किम जोंग उन याने देशाची सूत्रे हाती घेतली.

किम जोंग इल यांचा मृत्यू १७ डिसेंबर रोजी झाला होता. वयाच्या ६९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांनी १७ वर्षे देशावर राज्य केले. हा शोक दरवर्षी उत्तर कोरियामध्ये १० दिवसांचा असतो. मात्र यावेळी त्यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण झाल्याने ११ दिवसांचा केला आहे.त्यामुळे या दिवशी कुणीही बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाही. जर नियमांचं उल्लंघन केल्यास वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक करण्यात येणार आहे. इतकंच काय तर, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला तरी, त्यांना मोठ्याने रडण्याची परवानगी नाही आणि ते शोक संपल्यानंतरच मृतदेह बाहेर काढू शकतात.

रेडिओ फ्री एशियाशी बोलताना सिनुइजू शहरातील रहिवासी म्हणाले की, शोक काळात आम्ही दारू पिऊ शकत नाही, हसू शकत नाही किंवा इतर आनंद साजरा करू शकत नाही. नैऋत्य प्रांतातील दक्षिण ह्वांगहेमधील सूत्रांनी सांगितलं की, पोलिसांना लोकांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या दिवसात दु:खी दिसत नसलेल्या व्यक्तीला पोलीस अटक करू शकतात. हा ११ दिवसांचा कालावधी पोलीस अधिकाऱ्यांसाठीही त्रासदायक आहे. जर कोणी हुकुमाचे उल्लंघन करताना आढळले तर त्यांना उत्तर देणे कठीण होते. या भीतीमुळे अधिकारी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button