breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

“मला कोणीही फोन मेसेज करू नका…” ; खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक

Supriya Sule : राज्यात आणि देशात नेत्यांचे फोन हॅक आणि टॅप करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक बातमी आता राज्यातून समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

सुप्रिया सुळे या कायमच सोशल मिडीयावर ऍक्टिव असतात. त्यानुसार आज त्यांनी स्वतः सोशल मिडीयावर आपला फोन हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ‘हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलतात आणि फॉर्मवर..’;  देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला

आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुळे यांनी ही पोस्ट करत कार्यकर्त्यांना व जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यंत महत्वाचे आहे असे म्हणत सुळे यांनी ही पोस्ट लिहली आहे. कोणीही त्यांना फोन किंवा मेसेज करून नये असे त्यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button