तंबाखूबाबत मोठा निर्णय, केंद्र सरकारकडून नवे नियम जाहीर..
![New rules announced by the central government regarding tobacco](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/tobacco-780x470.jpg)
दिल्ली : आपण अनेक चित्रपट सुरू होण्यापूर्वी तर पाहतच असतो की तंबाखूच्या सेवनास विरोध दर्शविणाऱ्या अनेक जाहिराती दाखविल्या जातात. धुम्रपान आणि मद्यपान सेवनावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आता केंद्रीय आरोग्य विभागाकडून ओटीटी माध्यमांसाठी नवे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत.
आता हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, यांसारख्या अनेक ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रमात तंबाखूजन्य उत्पादने किंवा त्यांचा वापर प्रदर्शित केल्यावर स्क्रीनच्या तळाशी तंबाखूच्या सेवनास विरोध करणारा एक प्रमुख स्थिर संदेश द्यावा लागणार आहे.
हेही वाचा – Pune : पुणे पोलीसांची मोठी कारवाई, ५ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
ओटीटीवरील कोणत्याही कार्यक्रमात सुरुवातीला आणि मध्यभागी किमान ३० सेकंदाची तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी दाखवणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून या सूचना आज जागतिक तंबाखू विरोधी दिनादिवशी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रमांमध्ये नव्या नियमांचे पालन करण्यात आले नाही तर, केंद्रीय आरोग्य विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाकडून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.