breaking-newsताज्या घडामोडी

नाशिक हादरले! ब्रेकअपनंतर प्रेयसीने कुटुंबियांच्या मदतीने प्रियकराला जिवंत जाळलं; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक |

प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आलीय. १२ फेब्रुवारी रोजी संबंधित प्रकार घडला. तर १३ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाइन्स डेच्या पूर्वसंध्येलाच प्रेम प्रकरणामधून झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडीत तरुणाचा उपचारादरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडली आहे. ब्रेकअपनंतर प्रियकर प्रियसीच्या लग्नाला अडथळे आणत असल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. या घटनेत जखमी युवक ५५ टक्के भाजला होता. उपचारादरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात राहणाऱ्या गोरख काशिनाथ बच्छाव या ३१ वर्षे युवकाला मारहाण करत जिवंत जाळल्याची घटना शनिवारी घडली होती. कल्याणी गोकुळ सोनवणे या युवतीसोबत गोरखचे मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेम प्रकरणाला कल्याणीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले होते. गोरखने मात्र कल्याणी आणि तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र कल्याणीच्या कुटुंबीयांनी गोरख सोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार देत कल्याणीचं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला.

गोरखला ही बाब खटकली आणि त्याने कल्याणीच लग्न जिथे ठरले होते ते लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. याच रागातून शनिवारी दुपारच्या सुमारास कल्याणी सोनवणे आणि या युवतीचे आई-वडील भाऊ यांनी देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात जाऊन गोरखला मारहाण केली आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी देवळा पोलिसांनी कल्याणी सोनवणेसह तिचे वडील गोकुळ सोनवणे,आई निर्मला सोनवणे, भाऊ हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलीय. गोरखच्या मृत्यूनंतर आता आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button