ताज्या घडामोडीविदर्भ

आईनेच केली तीन वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या

नागपूर येथील धक्कादायक घटना

नागपूर : नातेसंबंधांना हादरा देणारी ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. जिथे आईने आपल्याच तीन वर्षांच्या निष्पाप मुलीची गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपीनी पोलीस ठाणे गाठून हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. २४ वर्षीय ट्विंकल रामा राऊत असे आरोपी महिलेचे नाव असून मुलगी तीन वर्षांची रियांशी राऊत असे आहे.

२०२०पासून ट्विंकलचा लांबचा नातेवाईक असलेल्या खापा तुमसर येथील रहिवासी असलेल्या रामा राऊत याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्या दोघांनीही पती-पत्नी म्हणून राहण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी त्यांना एक मुलगी झाली. दोघांनाही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय आल्याने त्यांच्यात घरगुती भांडणे सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाच महिन्यांपूर्वी दोघेही कामानिमित्त खापा तुमसर येथून नागपुरात आले आणि एमआयडीसी येथील बी.एस.के. पेपर प्रोडक्ट कंपनीत एकत्र काम करू लागले आणि कंपनीतच एका क्वार्टर मध्ये राहू लागले.

रामा आणि ट्विंकल सोमवारी दुपारी दोघे कंपनीमध्ये कामासाठी गेले होते, तेथे रामा हा दुपारी बाहेर गेला. तीन तासांनी घरी परतला, त्यावरून ट्विकल ला संशय आल्याने ट्विंकलचे रामाचे भांडण झाले आणि बाहेर जाण्याचे कारण विचारले असता रामाने देशी दारूच्या भट्टीत दारू प्यायला गेल्याचे सांगितले. मात्र, संशय आल्यानंतर महिलेने दारूच्या दुकानात जाऊन चौकशी केली असता तो तेथे आला नसल्याचे तिला समजले. यानंतर ती महिला घरी परतली आणि पती रामाशी पुन्हा भांडण करून तिची लहान मुलगी रियांशीला घेऊन बाहेर निघून गेली. त्यानंतर रामाने ट्विकलचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तो पुन्हा घरी परत आला आणि थांबला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस रामाच्या घरी आले व त्याला घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटलला नेले असता तिथे त्याला त्याचा मुलीची हत्या झाल्याचे कळले. रामाने पत्नी ट्विंकलला रियांशीचे मृत्यू बाबत विचारपूस केली असता तिनेच रियांशीचा गळा, तोंड,नाक,छाती दाबून मारून टाकले, असे सांगितले.

इलेक्ट्रिकल झोन चौक ते अमर नगर दरम्यान एका झाडाखाली तोंड दाबून त्याने मुलीची हत्या केली. मात्र, नंतर ट्विंकलने तिच्या अंतिम संस्काराबाबत लोकांना विचारण्यास सुरुवात केली, त्यानंतर लोकांनी तिला पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. ट्विंकल मुलीला आपल्या खांद्यावर घेऊन ऑटोमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, तिथे तिची चौकशी केल्यानंतर तिने मुलीचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.पोलिसांनी तात्काळ मुलीला लता मंगेशकर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी ट्विंकलला अटक केली असून अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्विंकलने बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते आणि आई-वडिलांच्या निधनानंतर ती तिच्या नातेवाईक असलेल्या रामासोबत राहू लागली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button