breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जगभरात १२ कोटी २८ लाखांहून अधिक कोरोनाबाधित, २७ लाखांहून अधिकांचा मृत्यू

वॉशिंग्टन – गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अद्यापही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. काही देशांत तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगात २७ लाखांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर, बाधितांची संख्या १२ कोटी २८ लाखांहून अधिक झाली आहे. त्यापैकी ६ कोटी ९५ लाखांहून अधिकजणांनी कोरोनावर मात केली आहे.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगातील १९२ देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १२ कोटी २८ लाख १२ हजार २८१ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत मृतांची संख्या २७ लाख ९ हजार ६२७ झाली आहे. कोरोनावर मात केलेल्या बाधितांची संख्याही मोठी आहे. कोरोनावर सहा कोटी ९५ लाख २३ हजार ९१ जणांनी मात केली आहे.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग थैमान घालत आहे. जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटी ९७ लाख ८३ हजारांहून अधिक झाली आहे. तर, पाच लाख ४१ हजार ९१४ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात तीन देशांमध्ये एक कोटीहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ब्राझील अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानी आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत एक कोटी १९ लाख ५० हजार ४५९ जणांना संसर्गाची बाधा झाली. तर, दोन लाख ९२ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातही मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतात एक कोटी १५ लाख ९९ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, एक लाख ५९ हजार ७५५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रशियातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रशियातील बाधितांची संख्या ४३.९७ लाख इतकी झाली असून ९३ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. युरोपीयन देशांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. फ्रान्समध्ये कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी पॅरिससह ११ ठिकाणी पुन्हा एकदा अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button