ताज्या घडामोडीदेश-विदेश

महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर स्वस्त

एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात

नवी दिल्ली : देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा (सार्वत्रिक) निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान होत असून ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. मात्र निवडणूक निकाल येण्यापूर्वीच महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आणि देशभरात १ जून २०२४ पासून एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली. व्यासायिक LPG सिलेंडरची किंमत सुधारित आणि कमी करण्यात आली आहे. जाणून घेऊया दिल्ली ते मुंबईचे नवीन दर…

LPF गॅस सिलिंडर झाले स्वस्त
१ जून २०२४ पासून एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, यावेळीही तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान सकाळी ६ वाजता सुरू होण्यापूर्वी कंपन्यांनी एलपीजी ग्राहकांना आनंदवार्ता दिली. अशाप्रकारे, आता १ जूनपासून दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५० रुपयांनी, कोलकात्यात ७२ रुपयांनी, मुंबईत ६९.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ७०.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

विशेष म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असून यापूर्वी, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला दिलासादायक बातमी आली आणि तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २० रुपयांनी कपात करण्यात आली.

मुंबई ते दिल्लीपर्यंत एलपीजी सिलिंडरचे नवीन दर
IOCL च्या वेबसाइटवर नवीन सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या गेल्या असून आता दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता १७४५.५० रुपयांवरून १६७६ रुपयांवर आली. याशिवाय कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडर १,८५९ रुपयांऐवजी १,७८७ रुपयांना मिळेल. त्याचवेळी, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १६९८.५० रुपयांना विकला जात होता, जो आता १६२९ रुपयांवर आला तर चेन्नईमध्ये १,९११ रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलेंडरची किंमत १,८४०.५० रुपयांवर आली आहे.

घरगुती सिलिंडरच्या किंमती जैसे थे
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. अशा स्थितीत त्याची किंमत कमी केल्यामुळे बाहेर खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते. दुसरीकडे, यंदाही स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आयओसीएलच्या वेबसाइटनुसार राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅसची किंमत ८०३ रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी ६०३ रुपये असून पूर्वीप्रमाणेच मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती सिलिंडर उपलब्ध असेल. यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत १०० रुपयांपर्यंत कपातीची भेट देत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button