breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

विधानसभा निवडणुकीसाठी मविआची जागावाटपाची बोलणी सुरु

Vidhan Sabha Election : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता काही महिने शिल्लक राहिलेत. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्याचे म्हटले जात आहेत. मागच्या आठवड्यात मुंबईत मविआची एक बैठक झाली. त्यामध्ये जागावाटपाची प्राथमिक बोलणी झाली होती असे म्हटले गेले. त्यानंतर आता यात महत्वाची बातमी समोर येत आहे.

येत्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीत प्रत्येकी 96-96-96 जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीत 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेत सर्वात चांगला स्ट्राईक रेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे.

हेही वाचा    –  OBCच शिष्टमंडळ शिंदे-फडणवीसांशी चर्चा करणार, लक्ष्मण हाकेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या? 

लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राईक रेटनूसार जागावाटप व्हावं, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जाऊ शकते. या आठवड्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष ते लढवू इच्छित असणाऱ्या विधानसभा जागांची माहिती एकत्रित करतील. त्यानंतर पुढील आठवड्यात महाविकास आघाडीची एकत्रित मुंबईत बैठक पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागा वाटपांचा तिढा लवकरात लवकर सोडवून महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद कोणत्या भागात आहे यावरुन जागावाटप आणि मतदारसंघ ठरवले जातील. त्यानुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत ठाकरे गटाच्या वाट्याला जास्त जागा येऊ शकतात. शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या जास्त जागांची मागणी करेल, असा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button