breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

६२ रुपयांना उबेर ऑटो बुक अन् बिल आलं तब्बल ७.६ कोटी, वाचा सविस्तर

Uber Ride Turns Nightmare | दीपक तेनगुरिया नावाच्या व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला. या व्यक्तीने उबर अॅपमधून एक ऑटो बुक केली होती, बुकवेळी त्याचे भाडे ६२ रुपये दाखवण्यात आले मात्र प्रवास संपताच भाड्याचे आकडे असे काही वेगाने वाढले की तुम्ही विचार करु शकत नाही. ग्राहकाला १०००, २००० नाही तर चक्क सात कोटींचे बिल दाखवण्यात आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उबर कंपनीने ग्राहकाला तब्बल ७,६६,८३,७६२ रुपयांचे बिल पाठवले. बिलमध्ये वेटिंग टाइम आणि दुसऱ्या डिटेल्सही देण्यात आल्या आहेत. कंपनीने १,६७,७४,६४७ रुपये ऑटो भाडे आणि वेटिंग टाईमसाठी ५,६६,०९,१८९ रुपये आकारलेत. या बिलात कंपनीने ग्राहकाला ७५ रुपयांची सवलत दिली आहे. या प्रवासासाठी ग्राहकाला कंपनीने ७.६ कोटी रुपये पेमेंट करण्यास सांगितले.

हेही वाचा    –    उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे 

दीपक तेनगुरिया यांनी एक्सवर एक ट्विट करत, या घटनेविषयी माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यावर उबर कंपनीच्या सपोर्ट बॉटने उत्तर दिलेय. ‘या घटनेबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला थोडा वेळ द्या, जेणेकरुन आम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करु, आणि तुम्हाला लवकरच अपडेट करु.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button