Mahashivratri : भगवान शंकराची पत्नी देवी सतीने घेतली श्रीरामाची परीक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/unnamed-2.jpg)
महाईन्यूज | अमोल शित्रे
भगवान शंकर आणि प्रभो श्री राम या दोघांनी एकमेकांना आपल्या वडिलस्थानी मानले आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाला त्यांनी कोंडीत टाकले आहे. वास्तविक पाहता दोघांपैकी कोण शक्तीशाली होते. हे आजअखेर न उलघडलेले कोडे आहे. एवढेच नव्हे तर भगवान शंकराची पत्नी सतीचा देखील शंकराच्या सांगण्यावर विश्वास बसत नाही. यातूनच रामाचा भ्रमनिरास व्हावा म्हणून सतीने दंडकआरण्यात हुबेहूब सितेचे रुप धारण केले. परंतु, रामाच्या अद्भूत शक्तीपुढे सतीचा हा डाव पूर्णपणे फसला गेला. तो कसा फसला याचा आढावा ”महाईन्यूज”ने ऐतिहासिक घटनांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
भगवान शंकराचे दोन विवाह झाले आहेत. पहिली पत्नी सती आहे. तर, दुसरी पार्वती आहे. शंकर पत्नी सतीसोबत दक्षिनेतील दंडकआरण्यात कुंभज ऋषीच्या आश्रमात भगवान रामाची कथा ऐकायला गेले होते. कुंभज ऋषींनी श्रीरामाच्या कथेचे यथासांग वर्णन केले. सतीला रामाची कथा उमजली नाही. मात्र, शिवजींना कथा पूर्ण समजली. कुंभज ऋषींनी इच्छापूर्तीसाठी मागणी घालण्यास सांगितले. त्यावर भगवान शंकराने जाताजाता श्रीरामाचे दर्शन घडवण्याची मनोकामना व्यतिथ केली. एवढे बोलून भगवान शंकर पत्नी सतिसह कैलास पर्वताकडे (हिमालय) रवाना झाले. दरम्यान, सीतेचं हरण झाल्यानंतर दंडकआरण्यात श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात भटकंती करत होते. त्यावेळी शंकर आणि रामाची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी शंकराने सचिदानंद म्हणून आपला माथा जमिनीवर टेकून भगवान रामाला प्रणाम केला.
शंकराने सचिदानंद बोललेलं पत्नी सतीला बिलकूल आवडलं नाही. एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या वियोगामध्ये दुखद होऊन तिचा शोध घेण्यासाठी राणावानात भटकत आहे. आणि माझा पती सचिदानंद बोलून त्यांना प्रणाम करत आहे. यामध्ये ना सच आहे, ना चित आहे,असा विचार सतीच्या मनात आला. यावरून सतिच्या मनामध्ये श्रीरामाच्या बाबतीत संशय निर्माण झाला. शंकराने सतिची समजूत घालण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु, सतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावर शंकर म्हणाले जर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुच रामाची परीक्षा घे. त्यावर सतीने परीक्षा घेण्याचा निर्णय मान्य केला. त्यासाठी सती एकटी निघाली. सतीने सितेचा अवतार धारण केला. त्यानंतर ती रामाच्या समोर गेली. त्यावर रामाने सतीच्या या फसव्या रुपाला ओळखले. प्रथम रामाने हात जोडून नमस्कार केला. राम म्हणाले देवी तुम्ही आरण्यात एकटी का भटकताहात. माझे पिता भगवान शंकर कुठे आहेत. हे म्हणताच सती घाबरली. आणि तेथून क्षणात निघून गेली.
…हीच देवाची मनोकामना
या कथेतून असा संदेश मिळतो की, आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीला कितीही समजाऊन सांगितले तरी ती व्यक्ती त्यावर विश्वास ठेवेलच असे नाही. याचा प्रत्यत सती आणि शंकर यांच्या माध्यमातून येतो. आपण कितीही समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही आपली व्यक्ती विश्वास ठेवत नसेल तर हीच देवाची इच्छा असल्याचे समजून जाण्याचा संदेश यातून मिळतो. इच्छु पूर्ण नाही झाली तरी देवाची इच्छा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरते. आणि जर यश आले तर तीही देवाची कृपा असल्याचे मानले पाहिजे, असा संदेश या कथेतून शेवटी मिळतो.