breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#LockDown |’या’कंपनीने व्हिडीओ कॉलवर सांगितलं आजचा शेवटचा दिवस आणि ३५०० कर्मचारी बेरोजगार

नवी दिल्ली | देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. प्रवासी टॅक्सी सेवा देणाऱ्या उबेर कंपनीने नुकतीच १४ टक्के कर्मचारी कपात केली. झूप एपवर घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉलवर कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. साधारण ३ मिनिटभर चाललेल्या या कॉलनंतर ३५०० कर्मचारी बेरोजगार झाले.

उबर कस्टरमर कंपनीचे प्रमुख शेवॉलो यांनी झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि ३५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत असल्याची माहिती दिली. मंदीचे दिवस असून कर्मचाऱ्यांसाठी ठराविक काम आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांचा आजचा कामाचा शेवटचा दिवस असल्याचे त्यांनी कॉलवर सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button