breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: आजपासून या दोन राज्यांमध्ये दारुची ‘होम डिलिव्हरी’

पंजाब सरकारने आजपासून राज्यामध्ये दारू विक्री सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे घरपोच दारू पोहोचवण्याचीही व्यवस्था केली आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत दारुची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंजाबमध्ये कर्फ्यू असला तरी दररोज चार तासांसाठी संचारबंदी शिथील करण्यात येते. या वेळेत दारू विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

कुठल्याही ग्राहकाला दोन लिटरपेक्षा जास्त दारुची विक्री करु नये असे मंगळवारी संध्याकाळी काढण्यात आलेल्या सरकारी आदेशात म्हटले आहे. दारू विक्रेत्यांना घरपोच दारू पोहोचवण्याची परवानगी दिली असली तरी त्यामध्ये काही अटी आहेत. दारुची डिलिव्हरी करणाऱ्या मुलांकडे कर्फ्यू पास, ओळखपत्र आणि डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी जे वाहन वापरणार त्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक असणार आहे. वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

पंजाबप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही दारुच्या होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली आहे. BEVCO ने वेबसाइट लाँच केली असून त्यावर २१ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती दारुची ऑनलाइन ऑर्डर देऊ शकते. दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर अनेक राज्यांमध्ये वाईन शॉपबाहेर मोठया रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन झाले.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्वाचे आहे. उलट मद्य विक्री सुरु केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसले. त्यामुळे करोनाचा अधिक फैलाव होऊ शकतो अशी टीकाही मोठया प्रमाणात झाली. मुंबईतही दारुच्या दुकानांबाहेर गर्दी झाल्याने दारू विक्रीचा निर्णय रद्द करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button