breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मेहुल चोक्सी प्रकरणात कायदेतज्ज्ञ हरिश साळवे मांडणार भारताची बाजू

नवी दिल्ली -पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी त्याच्याविरुद्धचा प्रत्यार्पण खटला लढवण्याची कामगिरी विश्वविख्यात कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. महाराणी एलिझाबेथ यांचे कायदे सल्लागार असलेल्या हरीश साळवे यांच्याशी भारत सरकारने संपर्क साधला आहे. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाबाबत डोमिनिका उच्च न्यायालयात भारताची बाजू कशी मांडायची या विषयी त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आता हरीश साळवे यांची एंट्री होण्याची शक्यता आहे.

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी कोणत्या प्रकारची कायदेशीर पावले उचलण्याची गरज आहे. याबाबत सध्या मी भारत सरकारला सल्ला देत आहे, असे हरीश साळवे यांनी स्वतःच सोमवारी जाहीर केले. मात्र डोमिनिका न्यायालयात भारताची बाजू मांडणार किंवा नाही हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. मेहुल चोक्सीप्रकरणीच्या खटल्यात भारत सरकार पक्षकार नाही. भारत केवळ डोमिनिका प्रशासनाला मदत करत आहे, असेही साळवे यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात भारताला बाजू मांडण्याची संधी मिळाली आणि ऍटर्नी जनरलने डोमिनिकाच्या न्यायालयात बाजू मांडण्याची तयारी दर्शवली. तर मी भारताच्या बाजूने हा खटला लढवू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी कुलभूषण जाधव प्रकरणात हरीश साळवे यांनी भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय कोर्टात खटला चालवला होता. पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवून परदेशात पळालेल्या मेहुल चोक्सीने २०१८ मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले आहे. डोमिनिकात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी त्याला अटक झाली आहे. याबाबत डोमिनिका उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी १४ जूनला होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button