कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा
संजय रॉयला न्यायालयानं ५० हजार रुपयांचा दंड ठोठवला

Kolkata Rape Murder Case | कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले होते. आज (दि.20 जानेवारी 2025) न्यायलयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
कोलकात्यातील आर.जी.मेडीकल कॉलेजमध्ये ३१ वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. यावर आता न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवण्यात आले आहे. भारतीय न्याय संहीता कलम ६४ (बलात्कारासाठी शिक्षा), ६६ (मृत्यूचे कारण बनल्यासाठी शिक्षा) आणि १०३ (हत्येसाठी शिक्षा) नुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : ..तेव्हाच ‘उदय’ होणार होता; संजय राऊतांचा मोठा दावा
कोलकाता येथील बलात्कार आणि हत्या प्रकरण आहे काय?
कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. ९ ऑगस्ट २०२४ ला ही घटना घडली होती. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. या घटनेतले नवे पैलू रोज समोर येत होते. तसंच आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील ट्रेनी विद्यार्थ्यांनी सुमारे दीड महिना आंदोलन केलं होतं. कोलकाता बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय हा रुग्णालयातील डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी आणि तिची हत्या करण्याआधी तो रेड लाइट एरियात गेला होता अशी माहिती समोर आली होती. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. सेलदाह कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु असून आज दुपारी २.४५ वाजता संजय रॉयला शिक्षा सुनावली जाणार आहे.





