breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Kia Sonet लाँच; Maruti brezza, Tata Nexon ला टक्कर देणार, जाणून घ्या किंमत

दक्षिण कोरियाची कंपनी कियाने भारतात दमदार एन्ट्री केली आहे. गेल्या वर्षी ऐन मंदीतही कंपनीने एसयुव्ही लाँच करून विक्रीचा धमाका केला होता. आता कियाने छोट्या एसयुव्हीच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. Kia ने आज बहुप्रतिक्षित किया सोनेट (Kia Sonet) भारतात लाँच केली असून किंमतही खूप कमी ठेवली आहे. तसेच फिचरही बरेच सारे एसयुव्हीमध्ये असलेले दिले आहेत.

किया सोनेटची सुरुवातीची किंमत 6.71 लाख रुपये असून टॉप मॉडेलची किंमत 11.99 लाख रुपये आहे. कंपनीने पहिल्या वर्षात 1 लाखाहून अधिक विक्री करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Kia Sonet ची लांबी 3995mm, रुंदी 1790mm आणि उंची 1610mm आहे. ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही HTE, HTK, HTK+, HTX, HTX+ आणि GTX+ ट्रीममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच ही कार 8 मोनोटोन कलरमध्ये उपलब्ध असेल. कियाने एसयुव्ही सेगमेंटमध्ये भल्या भल्या कंपन्यांना मागे टाकले असून आता सोनेटमुळे तिचा मुकाबला  Hyundai वेन्यू, Maruti ब्रेजा, Mahindra XUV300, Ford EcoSport आणि भारताची सर्वात सुरक्षित कार Tata Nexon सोबत होणार आहे. 


ही कार यंदाच्या सर्वाधक चर्चेत असलेल्या कारपैकी एक आहे. भारतात कियाची ही तिसरी कार असून याआधी कंपनीने Kia Seltos आणि Kia Carnival बाजारात आणलेली आहे. यापैकी सेल्टॉसने मंदीतही मोठी विक्री नोंदविली होती. Kia Sonet ला खासकरून भारतासाठी बनविण्यात आले आहे. ही कार आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील प्रकल्पामध्ये बनविण्यात आली आहे. इथूनच जगभरात ही कार पाठविली जाणार आहे. कंपनीने या कारला कनेक्टेड कार म्हणून समोर आणले आहे. ही कार iMT आणि व्हायरस प्रोटेक्शनसारख्या हाय़टेक फिचरने युक्त आहे. 


कियाने या कॉम्पॅक्ट SUV Kia Sonet मध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. याशिवाय Bose ची 7 स्पीकर सिस्टीम, इलेक्ट्रीक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आले आहेत. या कारला स्मार्टवॉचने देखील कनेक्ट करता येणार आहे. 


कियाच्या या कारमध्ये तीन इंजिन ऑप्शन मिळणार आहेत. शिवाय यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चा पर्याय मिळणार आहे. किया सोनेट GT Line मध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळणार आहे. कियामध्ये सेफ्टीफिचर्सही देण्यात आले आहेत. 6 एअरबॅग, ABS, EBD, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), ऑटो हेडलाइट, ब्रेक असिस्ट (BA), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC) सारखे फिचर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button