UPI ट्रांजेक्शन करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बँक खातं होईलं रिकामं
![Keep these things in mind while doing UPI transactions](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/UPI-Transaction-780x470.jpg)
UPI Transaction | सध्या अनेक लोक UPI चा वापर करत आहेत. एका दिवसात अनेक वेळा अनेक व्यवहार होतात. पाहिले तर डिजिटलायझेशन सध्या खूप व्यापक झालेय. डिजिटल पेमेंट बहुतेक GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे केले जात आहे. मात्र, UPI ट्रांजेक्शन करताना या गोष्टी लक्षात ठेवा..
पासवर्ड : बँक खाते आणि UPI ॲप सुरक्षित ठेवायचे असेल तर पासवर्ड आणि पिन सेट कराल तेव्हा अवघड पासवर्ड सेट करा.
UPI ॲप वेळोवेळी अपडेट करा : ॲप बऱ्याच काळापासून अपडेट न केल्यास हॅकर्सना आणि स्कॅमर्सना ते लगेच उपलब्ध होते. त्यामुळे जेव्हाही ॲप अपडेटचे ऑप्शन येते तेव्हा ते लगेच अपडेट करा.
हेही वाचा – एल्विश यादव पुन्हा अडचणीत, यूट्यूबरला मारहाण; व्हिडीओ व्हायरल..
सार्वजनिक WIFI : ऑनलाइन पेमेंटसाठी सार्वजनिक वाय-फाय कधीही वापरु नका. हॅकर्सद्वारे सार्वजनिक वाय-फायद्वारे फोन आणि बँक खाते हॅक केले जाऊ शकते.
पेमेंट हिस्ट्री : आपण अनेकदा ऑनलाइन पेमेंट करतो परंतु त्यांच्या ट्रान्जेंक्शन हिस्ट्रीकडे लक्ष देत नाही. ही सवय आपण बदलायला हवी. त्यामुळे तुमचे नुकसान टाळण्यासाठी आपण ट्रान्जेंक्शन हिस्ट्री तपासायला हवी.