महिलेसोबत अश्लिल संभाषण कर्नाटकच्या मंत्र्याचा राजीनामा
![Karnataka minister resigns after obscene conversation with a woman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/ramesh-jarkiholi-bjp-.jpg)
बेगळुरू- महिलेसोबत अश्लील संभाषण करतानाची टेप प्रसिद्ध झाल्यापासून वादाच्या भोवर्यात सापडलेले कर्नाटक जलसंधारण मंत्री रमेश जरकिहोली यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हेही विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
महिलेसोबतचा अश्लील संभाषणाची ऑडिओ टेप टिव्ही चॅनलवरून प्रसारित झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी बेंगळुरू येथील पोलीस ठाण्यात जलसंधारण मंत्री रमेश जरकिहोली यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.
त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी येडियुरप्पा सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यामुळे येडियुरप्पा यांनी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत रमेश जरकिहोली यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला.