Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इराणच्या तेल साठ्यांवर इस्रायलचे भीषण बॉम्बहल्ले; तेहरान-कारज हादरले

Israel strikes Iran oil depots | इस्रायलने इराणविरोधात आक्रमक पवित्रा घेत शनिवारी इराणमधील अनेक तेल साठवणूक डेपोंवर भीषण हल्ले केले. या हल्ल्यांमुळे राजधानी तेहरान आणि शेजारील कारज शहरात जोरदार स्फोट झाले असून परिसर आगीच्या ज्वाळा आणि धुराच्या लोटांनी व्यापला होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये हल्ल्याच्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात ज्वाळा आणि काळा धूर उसळताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर सलग हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत तेहरान आणि अल्बोर्झ प्रांतातील अनेक तेल साठवणूक केंद्रांना लक्ष्य करण्यात आले.

तेहरानच्या पश्चिमेला असलेल्या कारजमधील एका तेल डेपोवरही जोरदार हल्ला करण्यात आला. तसेच तेहरानजवळील रे जिल्ह्यात असलेल्या मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्पालाही लक्ष्य करण्यात आले. वायव्य तेहरानमधील शहरान तेल डेपोवर यापूर्वी जून महिन्यात हल्ला झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या परिसरावर हल्ला झाल्याने आग आणि धुराचे मोठे लोट आकाशात उसळले.

हेही वाचा      :          राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप; सुनील तटकरेंचं नाव घेत अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

दरम्यान, इराणच्या तेल मंत्रालयाने सांगितले की अग्निशमन दल आणि आपत्कालीन कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या हल्ल्यांमुळे देशात इंधन किंवा ऊर्जा टंचाई निर्माण होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या माहितीनुसार, इराणी तेल मंत्रालयातील एका सूत्राने पश्चिम तेहरानमधील कुहक आणि शहरान भागातील तीन डेपो तसेच कारजमधील सुविधांवर इस्रायली लढाऊ विमानांनी हल्ला केल्याची पुष्टी केली आहे.

इस्रायली लष्करानेही या हल्ल्यांना दुजोरा दिला असून, इंधन साठवणूक आणि ऊर्जा संकुलांचा वापर इराणच्या सशस्त्र दलांकडून केला जात असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button