Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इराणचा पाकिस्तानी सीमेवर हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Iran Attack Pakistan Border | इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावत असलेल्या पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. इराणने पाकिस्तानी सीमेजवळ हल्ला करत जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती इराणच्या तास्निम वृत्तसंस्थेने दिली आहे.

तास्निम वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या सीमेपलीकडून आग्नेय इराणमधील सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील रास्क भागात घुसखोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर इराणच्या सुरक्षा दलांनी बुधवारी सीमेजवळ लक्ष्यित हल्ला करत दहशतवादी गटाचा एक कार्यरत तळ नष्ट केल्याचा दावा केला आहे.स या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा 

पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींची सत्ता जाणार; अमित शाहांचा दावा

इराणने या दहशतवादी गटाचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. मात्र पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जैश-अल-अदल ही सुन्नी दहशतवादी संघटना २०१२ मध्ये स्थापन झाली असून गेल्या काही वर्षांत इराण-पाकिस्तान सीमेवर अनेक हल्ल्यांची जबाबदारी या संघटनेने स्वीकारल्याचे सांगितले जाते.

इराणी अधिकाऱ्यांच्या मते, २०१६ मध्ये भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणामागे याच दहशतवादी गटाचा हात होता. बंदर अब्बास परिसरातून त्यांचे अपहरण करून पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असताना झालेली ही कारवाई प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button