breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

LPG सिलिंडरमधील गॅस कमी तर नाही ना? QR कोडने मिळणार माहिती

LPG Cylinder QR Code | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने एक नवीन‘प्युअर फॉर शुअर’सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार आता बीपीसीएलचे एलपीजी सिलिंडर ज्यावेळी ग्राहकाच्या घरी पोहोच केलं जाईल त्यावेळी ते सील प्रूफ असेलच. याशिवाय त्यावर आता क्यूआर कोड देखील दिले जाणार आहेत.

ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलिंडरची गुणवत्ता आणि त्याच्या प्रमाणाची हमी देण्यासाठी ही नवी सुविधा बीपीसीएल कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. सिलेंडर भरताना त्याचे एकूण वजन किती होते? सील चिन्ह होते की नाही इत्यादी माहिती यामधून मिळणार आहे.

हेही वाचा      –      ‘शिवसेनेचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात असल्याने महिला सुरक्षित’; डॉ. नीलम गोऱ्हे 

यातून काय होणार फायदा?

सिलिंडरमधील काळाबाजाराला आळा घालण्यासाठी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. या कोडमध्ये सिलिंडरची सर्व माहिती असणार आहे. QR कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह एक खास प्युअर फॉर शुअर पॉप-अप दिसेल. यावर सिलिंडर संबंधित सर्व तपशील उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button