Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू, इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा

Ayatollah Seyyed Ali Khamenei | अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा अमेरिका आणि इस्रायलने केला आहे. इस्रायलकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात खामेनी ठार झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने दिली असून ANI नेही हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामेनी यांच्या कार्यालयाजवळ आणि निवासस्थानाच्या परिसरात अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाईत क्षेपणास्त्र डागले. बंकर बस्टिंग क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला. त्यांनी “इराणच्या सर्वोच्च नेत्याचा अंत केला” असा दावा करत अधिकृत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा      :          परदेशात असणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी, सुचनांचं पालन करण्याचं आवाहन

या घोषणेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दुजोरा दिला. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करत त्यांना “इतिहासातील अत्यंत क्रूर व्यक्तींपैकी एक” असे संबोधले. हा घटनाक्रम इराणी जनतेसाठी आणि जगभरातील पीडितांसाठी न्याय असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, इराणमधील सरकारी वृत्तसंस्था IRNA आणि प्रेस टीव्ही यांनीही खामेनी यांच्या मृत्यूची बातमी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. हल्ल्याच्या वेळी खामेनी आपल्या कार्यालयात उपस्थित होते, असे सांगितले जात आहे. मात्र या सर्व दाव्यांवर अधिकृत आणि स्वतंत्र पुष्टी अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही.

कोण होते अयातुल्ला अली खामेनी?

अयातुल्ला अली खामेनी यांनी १९८९ मध्ये इराणचे सर्वोच्च नेतेपद स्वीकारले. अयातोल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. तीन दशकांहून अधिक काळ ते इराणमधील सर्वात प्रभावशाली नेता म्हणून ओळखले जात होते. देशाच्या राजकीय, लष्करी आणि धार्मिक व्यवस्थेवर त्यांचे मोठे नियंत्रण होते. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कोअर (IRGC) वरही त्यांचा प्रभाव होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button