breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

SBIच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी! आज UPI सह ‘या’ सेवा राहणार बंद

State Bank of India | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयच्या काही सेवा आज बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये नेट बँकिंगचाही समावेश आहे. पण ग्राहक यादरम्यान युपीआय लाइट आणि एटीएमच्या माध्यमातून सेवांचा वापर करु शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या परिपत्रकात म्हटलं आहे की, आज २३ मार्च २०२४ रोजी दुपारी १.१० ते दुपारी २.१० दरम्यान इंटरनेट सेवा बंद राहणार आहेत. तसेच यादरम्यान ग्राहक इंटरनेट बँकिंग, YONO Lite, YONO Business Web आणि Mobile App, YONO आणि UPI या सेवा वापरू शकणार नाहीत. मात्र UPI Lite आणि ATM सेवा वापरता येतील.

हेही वाचा    –    पुणे शहरातून येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहतूक बंद 

कसे करता येईल पेमेंट?

जर ग्राहकांना या दरम्यान पेमेंट करायचे असेल तर UPI Lite वापरून पेमेंट केले जाऊ शकते. यासोबतच एखादी व्यक्ती एटीएम मशिनमध्ये जाऊन पैसे काढू शकता.

बँकिंग व्यवहाराबाबत ग्राहकांना काही समस्या आल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी काही टोल फ्री क्रमांक दिले आहेत. ग्राहक एसबीआयच्या टोल फ्री क्रमांक १८०० १२३४ आणि १८०० २१०० वर कॉल करू शकतात. याशिवाय एसबीआयच्या वेबसाइटवर जाऊनही आपल्याला हवी असलेली माहिती मिळवू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button