निवडणुकीत उमेदवाराने ‘या’ गोष्टी केल्या तर निवडणूक आयोगाकडे करू शकता तक्रार!
![If the candidate does these things during the election, you can file a complaint with the Election Commission](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Election-780x470.jpg)
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशावेळी उमेदवारांसह कार्यकर्ते मतदान करण्यासाठी मतदारावर दडपण आणू शकतात. मात्र तुम्हाला एक मतदार निवडणूक आयोगाकडे कोणकोणत्या गोष्टींबद्दल तक्रार करू शकतो हे माहित असणं अत्यंत गरजेचं आहे.
मतदान करण्याच्या मोबदल्यात पैसे भेटवस्तू, पद देण्याचे आमिष दाखवत असेल तर तक्रार करू शकता.
एखादी व्यक्ती मतदान करण्यासाठी तुम्हाला दारूचे आमिष दाखवत असेल तर तक्रार करू शकता.
हेही वाचा – लग्न करण्यापूर्वी जे ३६ गुण जुळवतात ते कोणते आहेत?
परवानगीशिवाय एखादा व्यक्ती किंवा पक्ष कार्यकर्ता पोस्टर लावत असेल तर तक्रार करू शकता.
कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावत किंवा त्रास देत असेल तर तक्रार करू शकता.
उमेदवाराने संपत्तीबाबत खोटी माहिती दिली असेल तर तक्रार करू शकता.
मतदानाच्या दिवशी मतदारांना एका जागेवरून जबरदस्ती दुसऱ्या जागी नेत असेल तर तक्रार करू शकता.
पोलिंग बूथपासून २०० मीटरच्या अंतरात कोणताही प्रचार केला तर तक्रार करू शकता.
धार्मिक भावनांना ठेस पोहचेल अश्या प्रकारे एखादे वक्तव्य करून लोकांमध्ये द्वेष निर्माण केला तर तक्रार करू शकता.