“आमचं कर्तव्य नाही असं म्हणू शकत नाही,” दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं
!["I can't say it's not our duty," the Delhi High Court slammed the Center](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Hospital-6.jpg)
नावी दिली |
राजधानी दिल्लीमधील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचं संकट निर्माण झाल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र तसंच राज्य सरकारला फटकारलं आहे. ही केंद्र आणि राज्य सरकार दोघांची जबाबदारी असल्याचं सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारलं आहे. “तुम्ही प्रस्थापित पुरवठा साखळीला ग्राह्य धरत नसल्याचं दिसत आहे. ते दिल्लीला पुरवठा करत होते. आदेश दिलेले असतानाही टँकर का अडवण्यात आले?,” अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी केली.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी दिल्ली सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांना याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली जाऊ शकते असं सांगितलं. गृहमंत्र्यांनी ऑक्सिजन टँकर्सना रुग्णावाहिकांप्रमाणे वागणूक देण्याचा आदेश प्रसिद्ध केला असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. यावर कोर्टाने, “आम्ही हे समजण्यात अपयशी ठरलो आहोत. आम्ही आपणास पुनर्निर्मितीच्या वाटपावर विचार करण्यास सांगितलं होतं. पण यातील काहीच झालं नाही. २१ लोकांनी आपला जीव गमावला आहे,” अशा शब्दांत फटकारलं. यावर तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना, माझ्याकडून पुरवठा झाला नाही असं नाही, हे माझं नाही तर राज्याचं कर्तव्य आहे असं सांगितलं. यावर उच्च न्यायालयाने हे तुमच्या दोघांचं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही सांगितलं.
वाचा- “ ‘सिस्टम’ फेल आहे…” म्हणत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा!