breaking-newsताज्या घडामोडी

गुंतवणूक करुन कसा वाचवाल कर? जाणून घ्या ‘हे’ पर्याय..

ITR Filing | प्रत्येक करदात्याच्या पगारातून जर तुम्ही योग्य वेळी कुठे गुंतवणूक केली नसेल तर टॅक्स कापला जातो. पण तुम्ही गुंतवणूक करुन कर वाचवू शकतात. काही पर्याय खालीलप्रमाणे :

एफडी : ५ वर्षांच्या कालावधीसाठी जर तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवले तर तुम्ही आयकर कायद्याच्या ८०C अंतर्गत १.५ लाख रुपयांचा कर लाभ घेऊ शकता. एफडीवर ७ ते ८ टक्के व्याज दिले जाते.

PPF : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या गुंतवणूकदारांना देखील करात सूट मिळते. पीपीएफमध्ये मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नाही.

इक्विटी लिंक्ड बचत योजना : इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम मध्ये, तुम्ही १ वर्षात १ लाख रुपयांपर्यंतची करमुक्ती करू शकता.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ६.८ टक्के व्याज देते. या योजनेत तुम्ही १ आर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांची कर कपात करू शकता.

हेही वाचा      –      काँग्रेसची अवस्था रंगमंचावरील ‘नाच्या’सारखी; भाजप नेत्याची खोचक टीका 

जीवन विमा : लाइफ इन्शुरन्स पॉलिसींमध्येही कर सूट उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपात करू शकता.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली : नॅशनल पेन्शन सिस्टम ही एक स्वयंसेवक योजना आहे. या योजनेत देखील, तुम्हाला प्राप्तिकर कायद्याच्या ८०CCD अंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे देखील कर वाचवता येतो. यामध्ये तुम्ही ८०C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ घेऊ शकता.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूकदारांना कर सवलतीचा लाभ मिळतो.

सुकन्या समृद्धी योजना : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत देखील तुम्ही पैसे गुंतवू शकतात. ही एक करमुक्त योजना आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button